अक्कलकुवा :- जिल्हा हिवताप अधिकारी नंदुरबार अंतर्गत हंगामी फवारणी कर्मचारी यांचा मेळावा दिनांक 20/ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता बस स्टॅन्ड जवळ रेस्ट हाऊस अक्कलकुवा येथे ठरविण्यात आला असून या मेळाव्याचे जास्तीत जास्त लाभ आदिवासी बांधवानी घ्यावा असे आव्हान केले आहेत. मेळाव्यात हंगामी फवारणी कर्मचारी यांचे समावेश पेन्शन साहवे वेतन फरक आणि इतर विषय संबंधित चर्चा होणार आहे. तसेच झालेल्या निर्णय ह्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, आणि हा मेळावा आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब भुजबळ भारतीय मजदूर संघ पुणे यांच्या नेतृत्वात संघाचे सरचिटणी अरुण नक्षीणे,चिटणीस प्रभाकर वाघ व उपाध्यक्ष भास्करराव कडसाईतकर यांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याकरिता नंदुरबार जिल्ह्यात सर्व तालुक्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांनी ह्या मेळाव्यात आवर्जून उपस्थित रहावे अशी नंम्र विनंती जिल्हा प्रतिनिधी सर्व श्री. मोतीराम दामोरे ,मानसिंग वसावे ,बहादुरसिंग वळवी, वीरसिंग वसावे ,संजय वळवी यांनी केला आहे. सहभागी होण्यासाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करा असे सांगितले आहे.7588061566,9322755419
जिल्हा हिवताप अधिकारी अंतर्गत, नंदुरबार मध्ये हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचा मेळाव्याचे आयोजन
भारतीय मजदूर संघ पुणे यांच्या नेतृत्वाने होणार हा मेळावा