त-हाडी:-आजचा विद्यार्थी व तरुणांमध्ये काही ना काही साध्य करण्याची स्किल असते फक्त त्यांना आत्मविश्वासाची कमतरता भासते. अशावेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर विद्यार्थी व तरुण आपल्या यशाकडे वाटचाल करतील असे मत पत्रकार ज्ञानेश्वर सैंदाणे यांनी सांगितले. आजच्या तरुणाईला गरज आहे ती आदर्श विचारांची आणि कुशल नेतृत्वाची आणि “कन्फ्यूज़” झालेल्या तरुणांना मार्ग दाखवण्याची.आजचा तरुणच उद्याची दशा आणि दिशा ठरवणार आहे, पण तरुणांना फितवणारे खूप आहेत व त्यांचा दुरुपयोग घेणारे असंख्य. तरुण दिशाहीन झालेत आहेत. आजचा तरुण उद्याच भविष्य आहेत.तरुणाई म्हन्टले की आठवतात ते “स्वामी विवेकानंद” आणि तरुणांबद्दलची त्यांची तळमळ. ते एक आदर्श गुरू आहेत. आपण स्वामी विवेकानंद” तर नाही बनू शकत पण त्यांच्या दिशेवर नक्की चालू शकतो.आजची राजकिय, सामाजिक, मानसिक आणि आर्थिक परिस्थिती पाहता मनातून वाटत आहे की तरुणांना मार्गदर्शन करण्याची व त्यांच्यातून कुशल नेतृत्व व परिपूर्ण व्यक्ती निर्माण करण्याची जवाबदारी खरोखर स्वत:ला लोकप्रतिनिधी, समाजसेवक, शिक्षक, पत्रकार व कार्यकर्त्यांची आहे. कारण देशाची मोठी ताकद असलेल्या तरुणांना जर असेच प्रभावहीन, नेतृत्वहीन व दिशाहिन ठेवले तर उद्याचे चित्र आजच्यापेक्षा अधिक किचकट असणार आहे. आजच्या तरुणांना शिक्षण योग्य हवे आणि शिक्षणातले तरी त्यांना साजेशी नोकरी देखील हवी पण या सगळ्यात आपल्याला जे करायचे आहे तेच एक प्रकारे मागे पडत आहे अर्थात स्पर्धेच्या युगात स्वतःच्या छंद जोपासायला वेळ नसतो नोकरीच्या मागे धावावे लागते याशिवाय इतरही अनेक यूवकांना भेडसावणाऱ्या समस्या असतात घरातील भांडणे प्रेम प्रकरणातील नैराश्य नोकरीची चिंता नौकरी नीट नसेल तर लग्नाची चिंता आत्मविश्वासाच्या असणारा अभाव वेळ न देता आल्यामुळे लग्नानंतरही भांडणे त्यातून लग्न झाल्यावर काही महिन्यातच निर्माण होणाऱ्या वैवाहिक समस्या त्यामधून होणारे घटस्फोट नात्यात येत असलेला दुरावा यातून वाढणाऱ्या आत्महत्या हे सगळे भयान वास्तव आजच्या तरुण पिढीसमोर आहे. जे जाते ते परत येत नाही ते आहेत तारुण्य, म्हणून सर्व संधीचा फायदा सर्व तरुणांनी घेतला पाहिजे आपल्या पुढील आव्हाने स्वीकारली पाहिजे तरुण हा शारीरिक मानसिक बौद्धिक व नैतिकदृष्ट्या समर्थ व संपन्न असले पाहिजेत चांगली माणसे आयात करता येत नाहीत ती घडवावी लागतात म्हणूनच घडलेल्या तरुणांशिवाय देशाला तरणोपाय नाही. तरुणांचा हात उगारण्यासाठी नसून उभारण्यासाठी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. तरुणांनी आपला आत्मविश्वास जागृत करायला हवा त्यांच्या आत्मविश्वास जागृत झाला तो जीवनात यश मिळू शकतो म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात देशाच्या इतिहास म्हणजे मूठभर आत्मविश्वास असणाऱ्या लोकांचा आहे. ज्यांच्या आत्मविश्वास कसला त्यांचे सर्व काही व्यर्थ आहे. तरुणांनी राजकारणातही पुढे यावे राजकारण म्हणजे केवळ भ्रष्टाचार पैसा नव्हे तर राजकारण म्हणजे एक समाजसेवा, राजकारण म्हणजे एक सत्तेचा उपयोग लोक कल्याणासाठी करणे राजकारण म्हणजे देशाची बदनामी नामुष्की नव्हे तर देशाचे भूषण. देशाची ओळख. हे सगळं सिद्ध करण्याची ताकद फक्त तरुणांमध्ये आहे. प्रत्येक तरुणांनी आपलं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये काम करून घराचा तसंच गाव तालुक्याच्या हितासाठी पुढे यावे जो थांबला तो संपला असे मत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सैंदाणे यांनी यावेळी सांगितले,
Post a Comment