त-हाडी:-पी एम किसान योजने प्रमाणे महाराष्ट्रात नव्याने सुरू करण्यात आलेली गेल्या अधिवेशनाच्या बैठकीत राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करण्याच्या निर्णय घेतला त्यात 87 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधीचा फायदा होणार होता, या योजनेचा पहिला हप्ता राज्य शासनाकडून योजनाही फक्त आश्वासने पुरते मर्यादित असून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये ची राज्य शासनाकडून भर मिळणार होती परंतु दसरा दिवाळी जवळ आल्याने देखील पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नसुन ती योजना फक्त नावालाच का असे यावेळी शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिला जाणार आहे, अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली ही नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्यरूपात मदत करणारे एक अभिनव योजना आहे. योजनेचा पहिला हप्ता मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल असे मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे स्पष्ट करण्यात आले होते.नमो शेतकरी योजनेची पहिल्या हप्त्याची रक्कम ही पी एम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच दिली जाणार होती.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता प्रत्येकी १२ हजार रुपये रोख रक्कम मिळणार होती.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कोणाला मिळानार होता, तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची रक्कम मिळते अशा सर्व महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार होते.नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी नव्याने कोणत्याही स्वरूपाची अर्ज प्रक्रिया करण्याची गरज शेतकऱ्यांना पडणार नाही, पी एम किसान योजनेच्या वेरिफिकेशन वरच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार होता असे यावेळी शासनाकडून सांगितले गेले.मे महिन्यात 31 तारखेच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार आहेत अशा खोट्या आश्वासने दिली गेली. आता तरी शेतकऱ्यांना थेट बँक खात्यावर पहिला हप्ता जमा करून देऊन दसरा दिवाळी सन शेतकऱ्यांचा साजरा करावा असे मत सामाजिक कार्यकर्ते किरण ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment