स्वखर्चाने जल पुनर्भरण-काका गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

अक्कलकुवा -( प्रतिनिधी):- शासनाने प्रयत्न करून देखील कुणी जल पुनर्भरण म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टींगकडे गांभिर्याने पाहत नाही. फक्त 'पाणी पातळी खोल झाली. . . खोल झाली' अशी ओरड सर्वच जण करतात. मात्र हव्या त्या उपलब्ध सुविधांचा वापर करून किती नियोजनबध्द पध्दतीत जल पुनर्भरण करता येते.याची प्रचिती तळोदा शहरातील काकेश्वर मंदिर परिसरात हा उपक्रम राबवून शहरात पाणी आडवा पाणी जिरवा याचा या करिता मंडळाच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला .

    मंडळातर्फे वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यात जनहिताचे व समाज हिताचे असे विविध उपक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असतात. स्वखर्चाने शहरातील काकेश्वर मंदिर परिसरात जल पुनर्भरण करण्यासाठी 100 फूट पाईप टाकला आहे. या उपक्रमात विजय शेंडे, संजय शेंडे,महेंद्र शेंडे ,अमर पिंपरे, राजेश शेंडे,ॲड.सचिन राणे, व्यंकटेश मगरे,दिनेश सागर, हितेश राणे, मेहुल पिंपरे,विवेक राणे,वैभव कर्णकार,कार्तिक राजकुळे,वेदांत राणे, सुधांशू राणे यासह सर्व गणेश भक्त उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार