राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तळागाळातील वंचितांना न्याय मिळवून देणार-ॲड.रुपसिंग वसावे

 

अक्कलकुवा-(प्रतिनिधी) - संदीप वसावे 

अक्कलकुवा :-  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शेतकरी, वंचित, कष्टकरी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सर्वच प्रश्न सोडवून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अक्कलकुवा- धडगाव विधानसभा अध्यक्ष ॲड.रुपसिंग वसावे यांनी सांगितले. अक्कलकुवा - धडगाव तालुक्यातील गटांमध्ये ॲड.रुपसिंग वसावे यांनी युवकांसी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाड्या वस्तीवर जाऊन विविध समस्या जाणून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्यामार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.स्थानिक पातळीवर युवकांना रोजगार मिळत नसल्याने ते हतबल आहेत. बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी लवकरच पाठपुरावा करणार आहे. तसेच महिला भगिनींना रोजगार मिळण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जावे अशी मागणी केली जाईल असेही त्यांनी पत्रकारांची बोलताना सांगितले.

पुढे बोलताना सांगितले की,ग्रामीण आदिवासी भागात आरोग्यसेवेचे तीन तेरा वाजले असून त्यावर प्रकाशझोत टाकून आरोग्यसेवा सुरळीत देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शासनाच्या योजनांसह जेष्ठ नागरिकांना पेन्शन, आरोग्य सुविधा, विद्यार्थ्यांना बस सुविधा, शाळेसाठी संगणक, क्रीडा प्रशिक्षण, एम पी एस सी प्रशिक्षण असे विविध कार्यक्रमांचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अक्कलकुवा तालुक्यातील अनेक ठिकाणी जाऊन जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधला तेथील अडचणी समजून घेतल्या. आदिवासी भागातील नागरिकांनी व्यथा मांडल्या.त्या सोडविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार तळागळात पोहचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द ॲड.रुपसिंग वसावे यांनी दिला. अक्कलकुवा तालुक्यात 76 ग्रामपंचायती असून काही ग्रामपंचायतीमध्ये पारदर्शक कामे दिसत नाही. त्यातील काही भ्रष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची सखोल चौकशी करण्यासाठी पुढाकार घेतला असून लवकरच जनतेसमोर आणणार आहे. असेही यावेळी पत्रकारांची बोलताना अक्कलकुवा - धडगाव विधानसभा अध्यक्ष ॲड.रुपसिंग वसावे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार