1) कु. नीलिमा हिच्या Viscera ची डॉक्टरांनी सामान्य व विशिष्ट रासायनिक चाचणी अंती कोणत्याही प्रकारचे विष दिसून आले नसल्याचे तपासणी अहवालामध्ये नमूद केले आहे तसेच मृत्यूचे अंतिम कारण हे “Asphyxia due to drowning” असे नमूद केले आहे.
2) आत्तापर्यंत पोलीसांमार्फत चिपळूण, खेड व दापोली येथील एसटी स्थानक, रेल्वे स्थानक व इतर ठिकाणचे CCTV footage ची पडताळणी करण्यात आलेली आहे.
या अकस्मात मृत्यूचा पोलीस तपास सुरू असताना दिनांक 17/08/2023 रोजी चिपळूण पोलीस ठाणे येथून 00/2023 नंबर ने दाभोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर_17/2023 भा.द.वि. संहिता चे कलम 306 अन्वये आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन प्रवृत्त केल्याबाबत श्री. सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्यातील फिर्यादी मध्ये श्री. सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी असे नमूद केले आहे की,
“दि. १५.०४.२०२३ ते दि. २९.०७.२०२३ या मुदतीत, आपली मुलगी दापोली येथील ज्या बँक मध्ये काम करत होती त्या ठिकाणी असणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड मुळ रा. कोल्हापुर, याला आपल्या दैनंदिन कामकाजाबाबत रिपोर्टिंग करावे लगत असे व ऑफिस मध्ये तिच्या कामाबाबत मॅनेजर संग्राम गायकवाड याच्याकडून नेहमी 15 दिवसांचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता तिला वारंवार सुट्टीवर असतानादेखील फोन येत असत.
आपल्या मुलीस दिवसाला 4-5 डी-मॅट खाती उघडण्याकरिता प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड हा जाणून बुजून दबाव आणत असलेबाबत सुट्टीच्या दिवशी दरवेळी आपल्याला व तिचा भाऊ अक्षय यास नीलिमा सांगत असे.
प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने नीलिमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव घातला होता व नीलिमाने आपला प्रामाणिक प्रयत्न करून देखील तिला काम जमत नसल्याचे बोलून, कामावरून काढून टाकण्याबाबत धमकी दिली होती व यातूनच ती चिंताग्रस्त झाली होती व घरामध्ये व्यवस्थित जेवत नसले बाबात देखील फिर्यादी मध्ये नमूद केले आहे.
श्री. सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी अन्वये दाभोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं 17/2023 भा.द.वि.सं चे कलम 306 अन्वये भा.द.वि. संहिता चे कलम 306 अन्वये आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे तसेच यातील आरोपित संग्राम सुरेश गायकवाड, वय 26, मुळ राहणार कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, सध्या राहणार. टी.आर.पी, रत्नागिरी यास गुन्ह्याच्या कामी दिनांक १७/०८/२०२३ रोजी २२.२० वाजता अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
Post a Comment