बिरसा फायटर्सच्या ३५२ व्या शाखेचे उद्घाटन !

 

*काम दमदार शाखा ३५२ पार!

अक्कलकुवा: महाराष्ट्रातील बिरसा फायटर्स ही एक सामाजिक संघटना आहे.आतापर्यत महाराष्ट्र शेकडो सामाजिक प्रश्न हाताळून सोडवली. नाला ता.अक्कलकुवा येथे ३५२ व्या शाखेचे उदघाटन झाले.शाखाध्यक्ष पंकज पाडवी, उपाध्यक्ष निलेश पाडवी, सचिव जहागीर वळवी, संघटक फत्तेसिंग पाडवी,कार्याध्यक्ष अजित वळवी, सल्लागार अजित किसन वळवी,सहसंघटक दिनेश वळवी, कोषाध्यक्ष दिपक वळवी,महिला प्रतिनिधी सौ.दीपिका पाडवी यांची नियुक्ती केली.यावेळी जिल्हा संघटक यशवंत वळवी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,तळोदा सहसंघटक सतीश पाडवी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संघटनेचे महत्व,कामे,आदिवासी संस्कृती, शिक्षण,विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले.नवनिर्वाचित सर्व गाव शाखा पदाधिकारी व सदस्य यांचे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष मनोज पावरा, महासचिव राजेंद्र पाडवी यांच्यासह अनेक बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार