जि.प.मराठी शाळा त-हाडी येथे भलकार बाबांची पुण्यतिथी साजरी

 

त-हाडी:-जि. प.मराठी शाळा त-हाडी येथे दि.31 जुलै रोजी कै.नथू सोनजी भलकार बाबा यांची ५२ पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रथम भलकार बाबांची प्रतिमेचे पूजन करून नारळ फोडून अभिवादन करण्यात आले. भलकार बाबांनी त-हाडी गावातील शाळेसाठी एक एकर शेती ही दान देऊन गावासाठी शिक्षणाचं ज्ञानमंदिर हे जिल्हा परिषद मराठी शाळा त्या जागेवर उभारण्यात आले. त्या शाळेतून कित्येक विद्यार्थी विद्यार्थीनी आज शिक्षण घेऊन उच्च पदावर नोकरी करत आहेत.या भलकार बाबांचे एवढे दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या विचाराने त-हाडी गावात शाळा सुरू झाली. त्यानिमित्ताने बाबांची 31 जुलै हा पुण्यतिथी दिवस असल्याने दरवर्षी बाबांना शाळेत अभिवादन करून पुण्यतिथी साजरी केली जाते.

अभिवादन करण्यासाठी जमलेले कार्यक्रमाला उपस्थित त-हाडी गावातील उपसरपंच ऊजनबाई अहिरे हे अध्यक्षस्थानी होत्या. त-हाडी येथील सरपंच प्रतिनिधी सुनील धनगर, सूतगिरणीचे संचालक सुदाम बापू भलकार, गटनेते तुळशीराम भामरे.तापी विद्या परिसर संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदलाल कश्यप. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश पाकळे. उपाध्यक्ष सतीश सोनवणे पोलीस पाटील प्रताप सिंग गिरासे.नितीन पाटील सर. माजी उपसरपंच अशोक सोनवणे. प्रफुल डामरे. विशाल करंके. मल्हार भलकार. युवराज भलकार मुकेश परदेशी .पोस्टमास्तर ताराचंद जाधव किरण अहिरे भगवान खोंडे. किरण भलकार.चिंतामण धनगर. ज्ञानेश्वर भलकार. सुनील भामरे. प्राचार्य दिलवरसिंग गिरासे. पत्रकार ज्ञानेश्वर सैंदाणे.पिंटू कदम. त-हाडी ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक व शिक्षिका कार्यक्रमाला उपस्थित राहुन भलकार बाबांना अभिवादन केले. शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ही बांबाविषयी भाषण दिले. शाळेतील मुख्याध्यापक अशोक बडगुजर व रावसाहेब चव्हाण सर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार शिवांगी देवरे मॅडम यांनी मांडले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार