मोलगी :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या वतीने मोलगी ग्रामपचायत येथे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले . यावेडी सहायक आयुक्त समाज कल्याण नंदुरबार देविदास नांदगावकर व बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांच्या मार्गदर्शन नुसार बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी यांनी मोलगी ग्रामपंचायत याठिकाणी विविध झांडाचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मोलगी ग्रामपचायतचे सरपंच ज्योती तडवी वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी आजच्या पिढीने स्विकारली पाहिजे असे आव्हान युवा पिढीला केले. तसेच बावा गोसावी ग्रामसेवक निसर्ग समतोल राखण्यास आज होत असलेल्या वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी आजच्या पिढीने स्विकारले पाहिजे असे प्रतिपादन केले. बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी यांनी सातपुडा परिसरात जंगल तोड मोठ्या झाल्यामुळे पर्यावरणाच्या नुकसान दरवर्षी होत असल्याने व तापमान दरवर्षी वाढत असल्याने येथील सर्व नागरिकासह जाणकारांना जंगल वाचवले पाहिजे व पर्यावरणाच्या रक्षण करण्यासाठी झाडे लावणे व त्याचे संरक्षण करणे येणाऱ्या पिढीला चांगले जीवन जगता आले पाहिजे रोजगाराचे संध्या निर्माण झाल्या पाहिजे खास करून निसर्गाचे रक्षण झाले पाहिजे. व सर्व नागरिकांना पर्यावरणाला घेऊन काम करण्याची व जंगल तोडीचे नुकसानीचे थांबायला पाहिजे उदाहरण देऊन गावातील नागरिकांना पर्यावरण वाचवण्याचे फायद्याचे उदाहरण देऊन गावातील नागरिकांच्या उत्साह निर्माण केला. वृक्षारोपण कार्यक्रमात मोलगी ग्रामपचायत व बार्टीचे समतादूत प्रकल्पाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रंगी सरपंच ज्योती तडवी बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी, प्रा डाँ. सिताराम जाधव,प्रदिप तडवी, बावा गोसावी ग्रामसेवक, इंदिरा पाडवी अंगणवाडी सेविका,हिरा वसावे अंगणवाडी सेविका, गोविंद पाडवी, अर्जुन वसावे, दिपक वसावे, नितेश वसावे, वाड्या वसावे, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व विद्यार्थी इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.