ज्ञानेश्वर सैंदाणे यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष पदी निवड

Advertisement

 

 त-हाडी:-येथील हुशार अभ्यासु व आदर्श व्यक्तिमत्व असलेले सत्य परखडपणे आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना नेहमीच वाचा फोडणारे गोरगरीब जनतेच्या बुलंद आवाज करण्यासाठी लेखणीचे क्षेत्र हाती घेणारे लेखणीच्या माध्यमातून रोखठोक विचार मांडणारे श्री ज्ञानेश्वर सैंदाणे यांची समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकारांच्या बहुउद्देशीय संघ. भारत सरकार मान्य राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघामध्ये शिरपूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. भारत सरकार मान्य राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. संतोषजी निकम सर व राष्ट्रीय महासचिव श्री रमेश देसाई सर,प्रदेशाध्यक्ष श्री वैभव पाटील सर ,यांच्या मार्गदर्शनाखाली. तसेच सौ. नीताजी कुलकर्णी. जिल्हाध्यक्ष श्री दीपक जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली आहे.

सैंदाणे हे आपल्या शिरपूर तालुक्यात दैनिक महाराष्ट्र सारथी. व प्रेस पथक या वृत्तपत्रास प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत ते अखिल भारतीय जीवा सेना संघामध्ये शिरपूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदावर ही काम उत्तमपणे करतात. सामाजिक प्रश्नांवर लिखाण करत यांनी आपल्या लेखणीतून बातमीच्या माध्यमातून समाजाचे गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.त्यांचे भारत सरकार मान्य राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघामध्ये शिरपूर तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे तालुक्यातून व त-हाडी गावातून त्यांच्या निवडीबद्दल कौतुक केले जात आहे.

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार



Post a Comment