धडगाव :- धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याची जोळणारा आणि कमी अंतराचा मार्ग हा (Chandshaili) चांदसैली घाट असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. जागोजागी रस्ता खचलेला असून नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. यातच खराब रस्त्यांमुळे हा भीषण अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे.
4 मृतदेह काढले बाहेर
नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाट हा तिव्र उतार व वळणाचा असल्याने येथे अनेक अपघात होत असतात. यात उतारामुळे वाहन अनियंत्रीत होवून दरीत कोसळले. यात वाहनात असलेल्या ६ जणांपैकी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृतीही गंभीर आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू असून तीन जणांचे मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले आहे.
Post a Comment