निवेदनात म्हटले आहे की जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाज खूप मोठया संख्या आहेत आणि एकी कडे सर्वोच्च न्यायालय म्हणते की या देशाचा"मुळमालक" आदिवासी असुन ही समाजावर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात अन्याय,अत्याचार होत आहे आणि आदिवासी समाज शेतमजूरी करुन राहत आहेत आदिवासीनी आज पर्यंत चा इतिहास आहे की कोणाला ही विरोध केलेला नाही तरी सुद्धा काही इतर समाजातील लोक जाणबूजून ही आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करत आहेत जळगाव जिल्ह्यातील असे अनेक गावांतील आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत आणी त्यांना मारहाण करत आहेत असाच एक प्रकार गाव शिंदाड ता.पाचोरा.जि जळगाव येथे घडलेला आहे,पोलिस प्रशासन यांना एकच सांगायचे आहे की तुम्हाला जनतेच्या सेवेसाठी ठेवले आहे की तरी आदिवासी समाजावर येवढा मोठा अन्याय कारक घडत असुन ही सरकार चुपचाप बघत आहे आदिवासी समाज या देशाचा मुळमालक असुन ही त्या वर येवढा मोठा अन्यायकारक होत आहे ही महाराष्ट्र ची शोकांतिका आहे कोणी ही येतात आणि आदिवासी समाजावर अत्याचार करतात आहेत आदिवासी समाज लाचार आहे म्हणून का येवढे अत्याचार करतात आहेत राज्य सरकारने व पोलिस प्रशासनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आदिवासी समाज चुप आहे म्हणून गैरफायदा घेत आहेत जेव्हा आदिवासी समाज जागृत झाला ना तेव्हा बघा मग काय होते मग म्हणून राज्य सरकार ला विनंती आहे की आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात यावी,तसेच एक प्रकरण काही दिवसा पासून जळगाव जिल्ह्यातील गाव.वाडी ता.जामनेर जि.जळगाव.येथील (मयत) धृपदाबाई हिरामण भिल,यांना शासना मार्फत इदिरा आवास योजना अंतर्गत घरकुलचा लाभ मिळाला होता.दि.२२.०८.२०२२ रोजी ठीक ०३. वाज्याच्या सुमारास शेजारील शेषराव माणिकराव पाटील व विश्वास शंकर पाटील यांनी सरपंच /ग्रामसेवक यांच्या संगम मतांनी आपल्या स्वतःच्या जेसीपी क्र.MH.१९ CJ १०२९ व विना नंबर ट्रॅक्टरच्या सहाय्याने न विचारता घरकुल उध्वस्त करून परस्पर मटरेल ची विल्हेवाट लावण्यात आली म्हणून दि.२३.०८२०२२ रोजी जामनेर पोलीस निरीक्षक "किरण शिंदे साहेब"यांना यांच्या नावाने लेखी पत्र देण्यात आले त्या नंतर २९.०८.२०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस उपोषण करण्यात आले त्या नंतर(डीवायएसपी)पाचोरा जबाब नोंदवण्यासाठी गेलो असता त्या नंतर डी वाय एस पी साहेबांकडून लेखी पत्र देणायत आले की तुम्ही न्यायालयात जाऊ शकतात त्या नंतर कलेक्टर महोदय यांना लेखी स्वरुपात पत्र देण्यात आले आज पर्यंत कुठल्याही प्रकारे संबंधित लोकांविरुद्ध आज पर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही,म्हणून आमची मागणी आहे महोदय की संबंधित लोकांचे वाहन जप्त करून ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, असे जिल्हात अनेक ठिकाणी आदिवासी समाजावर गंभीर पणे अन्याय अत्याचार होत आहे सदर आरोपींना अटक करून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी विनंती आहे सदर आरोपींना शिक्षा नही झाली तर आम्ही आमच्या संघटने मार्फत पूर्ण राज्यात आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामस शासन प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.