अक्कलकुवा :- अक्कलकुवा तालुक्यातील दाब येथे दि.30 एप्रिल रोजी आदिवासी एकता युवा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आहेत.वेळ सकाळी साडे दहा वाजता सांस्कृतीक रॅली आकरा वाजता आहे. आणि तीन वाजेपासून वक्त्यांचे भाषण राहणार आहे.या संमेलनात संस्कृतीक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.या संमेलनमध्ये राजस्थानचे भंवरलालजी परमार, कुसुम राऊत, मध्य प्रदेशातून विक्रम असालिया, गजाननभाई ब्राह्मणे, गुजरात मधून अशोक चौधरी, सांगल्याभाई वळवी हे आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवर सामाजिक विषयांवर उध्दोधन करणार आहे. या संमेलनात युवक वर्ग खेडापाड्यात जाऊन व सोशोल मीडियाच्या माध्यमातून युवकांना आणि इतर आदिवासी बांधवांना या कार्यक्रमाची माहिती समजवून सांगत आहे.
यावेळी धडगाव तालुक्यातील मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहेत. आदिवासी समाज बांधवांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचे आहे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक डोंगर बागुल, रवि पाडवी, सामा वळवी, पेरेसिंग पाडवी, दिलीप वसावे, दिनकर पाडवी, आपसिंग पाडवी, मनोज तडवी, आणि आदिवासी एकता परिषदच्या अधिकाऱ्यांनी केला आहेत.