जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजा वर अन्याय करणारे पोलिस प्रशासन व गावातील समाजकंटक व्यक्ती वर कायदेशीर कारवाई करा:- राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे

जळगाव:-जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावात दि. 14/04/2023 रोजी घडलेल्या घटनेनंतर उद्भवलेल्या आदिवासी आक्रोशाला स्थानीय पोलीस प्रशासनाने सामंजस्याने न हाताळता पोलीसी बळाचा वापर करुन प्रकरण हाताळल्याने सदर प्रकरणाची उच्चस्तरीय विभागीय चौकशी होऊन संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊन त्यांना तातडीने निलंबीत करण्याबाबत.अशी मागणी बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पोलिस अधिकारी जळगाव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे,राज्याध्यक्ष मनोज पावरा, महासचिव राजेंद्र पाडवी, सचिव संजय दळवी,महानिरीक्षक दादाजी बागुल,कार्यकर्ते राजेश धुर्वे, नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा, कोकण विभाग अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत,विदर्भ अध्यक्ष सोयाम,पालघर जिल्हाध्यक्ष मनोज कामडी, ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष उमाकांत कापडणीस, नंदुरबार जिल्हाध्यक्ष भरत पावरा , नंदुरबार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जलिंदर पावरा, नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष संतोष वळवी,धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, शहादा तालुकाध्यक्ष संदीप रावताळे,अक्कलकुवा अध्यक्ष मानसिंग पाडवी, तळोदा अध्यक्ष सुभाष पावरा, पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी, पुणे जिल्हा सचिव राहुल पावरा, इत्यादी राज्यातील पदाधिकारी यांनी महाराष्ट्र शासनास ईमेल द्वारे व प्रत्यक्षात निवेदन पाठवले आहे. वाॅटसप ग्रुपवर या घटनेबाबत सरकारचा बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.निवेदनात म्हटले आहे की 

 संदर्भ :-1) दि. 18/2/2023 रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजावर पोलीस स्टेशन मध्ये कापूस चोरीचा दाखल करण्यात आलेला गुन्हा.2) दि. 7/3/2023 रोजी रात्री 7.30 ते 8 च्या दरम्यान आदिवासी तडवी भिल्ल समाजावर करण्यात आलेला गावगुंड व समाजकंटकांनी हल्ला केल्याचे व्हीडीओ फुटेज (घरातील सर्व सामानाची तोडफोड व किंमती वस्तू लंपास केल्या) 3) दि. 14/4/2023 रोजी आंबेडकर जयंती निमित्त शिंदाड गावात निघालेली संध्याकाळी रैली.4) दि. 15/4/2023 रोजी आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या रैलीत आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या मजूरांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात आदिवासी समाजातील अडानी,निरक्षर,भोळसट लोकांनी तिथल्या स्थानिक लोकांच्या इशाऱ्यावर न्याय मिळण्यासाठी केलेले अनवचनाचे गैरकृत्य (कायदा हातात घेतला) बिरसा फायटर्स महा,राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयास्तरावर तक्रार निवेदन सादर करण्यात येत आहे की जळगांव जिल्हयातील पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावात गैर आदिवासी लोकांचे सट्टा, जुगार, व्याजाने पैसे देणे (खाजगी सावकार) असे तसेच देशी व गावठी दारुचे धंदे,तसेच हॉटेल वर व रस्त्यावर खुलेआम होत असलेली सदर दोन नंबर व्यवसायांची विक्री यामुळे सदरील गैर आदिवासी लोकांकडे पैसा हा वारेमाप झाला असल्याने आदिवासी तडवी भिल्ल समाजास केवळ नाम साधर्म्यामुळे तसेच तुम्ही मुस्लीम नाही तुम्ही हिंदू आहात असे बळजबरीने त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार सदरील गावात घडत असल्याच्या बहुतांश तक्रारी किंवा त्यासंदर्भात चर्चा पंचक्रोशीत आजही सुरु आहेत. 

दि.18/2/2023 रोजी घडलेली घटना म्हणजे सदरील ठिकाणी मोठा जुगाराचा अड्डा असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी वा तेथील स्थानिक लोकांना माहिती होती. तसेच पोलीस प्रशासनाला देखिल होती. परंतू सदरील जुगाराच्या अड्डयाला आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या युवकांकडून त्रास होत असल्याने दि. 18/2/2023 अंतर्गत आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठविण्यात आले. परंतु प्रकरणाची कोर्टापुढे सुनावणी झाली असता अथवा प्रकरण सादर झाले असता सदरील युवकांना पोलीस कस्टडी न देता मे. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. सदरील गुन्ह्यात जर आदिवासी युवकांचा खरोखरच समावेश असेल किंवा त्यांच्या हातून गैरकृत्य घडले असेल तर त्यांना कायदेशीर शिक्षा व्हावी अशी बिरसा फायटर्स व सामाजिक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. परंतू दि. 7/3/2023 रोजी सदरील युवक हे केवळ जामीनावर बाहेर आहेत म्हणून विनाकारण वाद तयार करुन दि. 7/3/2023 रोजी रात्री 7.30 ते 8 च्या सुमारास कमीत कमी 200 ते 300 लोकांचा समूह आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या लोकांच्या घरावर हल्ला करण्यासाठी गेले व त्यांनी आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या घरांची तोडफोड केली. तसेच त्यांच्या गाड्या, मोटरसायकली, पाण्याच्या टाकी, टि.व्ही. मोटरसायकल यांची मोडतोड करण्यात आली. सदरील घटनेमुळे शिंदाड गावातील शिदाड ते पिंपळगांव रस्त्यावरील मारुती मंदीरा जवळील आदिवासी तडवी भिल्ल समाजातील सर्व समाजबांधव हा जीवाच्या भितीने गाव सोडून भयभीत होऊन निघून गेला होता. वरील सामनेवाले अ.नं. 1 व 2 यांनी सदरील प्रकरणात केवळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत केवळ 6 ते 7 लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. परंतु पीडीत परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची शासन व प्रशासन स्तरावर कागदोपत्री कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे पीडीत परिवारांचे अजूनही नुकसान भरपाई झालेली नाही. तसेच दि. 15/04/2023 पर्यंत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल असलेल्या लोकांना अटक न करुन आदिवासी समाजाला असुरक्षित करण्यासाठी सदरील सामनेवाले 1 ते 7 यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच आदिवासी तडवी भिल्ल समाज हा अडाणी,भोळसट व निरक्षर असल्याने अन्यायाबाबत तक्रार देण्यास पिंपळगांव पोलीस स्टेशनला जर का गेले तर त्यांच्यावरच प्रश्नांची सरबती करुन त्यांना बहुतांश वेळा हाकलून देण्यात येत होते किंवा त्यांना आपमानास्पद वागणूक देण्याचे जणू काही केंद्रच पिंपळगांव पोलीस स्टेशन बनले आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि सदरील अनुभव आम्हाला देखिल आला आहे. जर आदिवासी तडवी भिल्ल समाजातील कोणी तक्रारदार, अडाणी, निरक्षर असेल तर त्यांच्या सोबत प्रतिष्ठित व्यक्ती. सामाजीक संस्था, सामाजिक संघटना यांच्या प्रतिनिधींनी प्रशासना सोबत समन्वय साधून, समुपदेशन करुन घडलेल्या घटनेचे गांभीर्यानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे अशी नियमावली असतांना पिंपळगांव हरेश्वर परिक्षेत्रातील पोलीस स्टेशनमध्ये सर्रासपणे पायमल्ली केली जात आहे व सदर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी हे केवळ

राजकीय हितसंबंध असलेल्या लोकांचे हित जोपासण्यात व त्यांचे माध्यमातून स्वतःचे हित जोपासण्यात मग्न झाले आहे. सदरील प्रकरणामुळे आदिवासी तडवी भिल्ल समाजात एक असुरक्षिततेची भावना वेळोवेळी आकार घेत होती आणि ही पोलीस प्रशासनाला माहिती असतांना कर्तव्यात कसूर करून संबंधीतांना अटक न करता पदाचा गैरवापर करुन आदिवासी किंवा कायद्याच्या विरोधात सतत काम केले आहे. दि. 14/4/ 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती निमित्त शिंदाड गावात रॅली काढण्यात आली असता सदरील रॅली ही शिंदाड बस स्टॅन्ड पासून सातगांव डोंगरी रोडवर जात असतांना महादेव मंदीरा जवळून ते रिलायन्सचे टावर पर्यंत सदरील रॅली आली असता सदरील भाग हा आदिवासी तडवी भिल्ल वस्तीचा दुसरा भाग म्हणून परिचित आहे. म्हणजेच दि. 7/3/2023 ची घटना ही आदिवासी बहुल वस्ती 1 मध्ये घडली असून दि. 14/4/2023 रोजी ची घटना ही आदिवासी बहुल वस्ती 2 मध्ये घडली आहे. आणि सदरील घटना आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या 4 ते 5 मुलांना अमानुष मारहाण करण्यात आली. सदरील घटना ही रात्रीच्या वेळी घडली असल्याने सदरील घटनेबाबत पोलीस प्रशासनाने त्यावेळेस फिर्यादी / तक्रारदार हे पिंपळगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास गेले असता त्यांना केवळ मेमो देण्यात येऊन केवळ दवाखान्यासाठी पाठविण्यात आले. सदरील पिडीत तक्रारदार यांच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असता गुन्हा सकाळी दाखल करु असे सांगण्यात आले.

त्यामुळे आदिवासी तडवी भिल्ल समाजातील लोकांमध्ये आक्रोशाचा उद्रेक होऊन त्यांच्या हातून अनवधनाने रागाच्या भरात सदरील गैरकृत्य झाले. सदरील गैरकृत्य करतांना सदरील घटनेची, वातावरण निर्मिती कोणी केली आदिवासी तडवी भिल्ल समाजातील अडानी, निरक्षर लोकांना रस्त्यावर उतरण्यास कोणी भाग पाडले ? पोलीस प्रशासना विरोधात गेल्या 1 ते दिड महिन्यातील नाराजी स्थानिक लोकांमध्ये का आली याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच हाती आलेल्या किंवा उपलब्ध असलेल्या व्हिडीओ मध्ये तडवी भिल्ल समाजाच्या वतीने युवक हे लाठ्या काठ्या घेऊन फिरतांना दिसत आहे. परंतू सदरील व्हीडीओ मध्ये आदिवासी समाजातील युवक हे पोलीस प्रशासनासोबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करतांना, अपशब्द बोलतांना दिसून येत नाही. किंवा कोणाचेही घराचे मोडतोड करत असल्याचे व्हिडीओत दिसून येत नाही. असे असतांना पोलीस प्रशासनातील वरील अ.नं. 1 ते 7 यांनी वरीष्ठांना चुकीची माहिती देवून आदिवासी तडवी भिल्ल समाजातील लोक हे आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते त्यामुळे आम्हाला कडक कारवाई करावी लागली. सदरील कारवाई मुळे आदिवासी तडवी भिल्ल समाज हा व्यथित झाला असून आदिवासी तडवी भिल्ल समाजातील आदिवासी बहुल वस्ती नं.2 मधील हा पुन्हा एकदा जिवाच्या भितीने गांव सोडून निघून गेला आहे. अ.नं. 1 ते 7 यांच्या छत्रछायेखाली आदिवासी तडवी भिल्ल वस्तीतील घरांची तोडफोड होणे, त्यांच्या बकर्या, कोंबड्या चोरून नेणे, गाड्यांची नासधूस करणे तसेच आदिवासी तडवी भिल्ल समाजाचे विरोधात शेरेबाजी अर्वाच्य शिवीगाळ, धमकी वजा इशारे देण्याचे प्रकार आजही सुरु आहे. आदिवासी तडवी भिल्ल समाजाला खरी संरक्षणाची गरज पिंपळगांव हरेश्वरच्या पोलीस स्टेशनच्या अ.नं. 1 ते 7 पासून असून त्यांच्या जाचाला पंचक्रोशितील संपूर्ण आदिवासी समाज हा कंटाळलेला आहे. तसेच नाराज व आक्रोशित आहे. अ.नं. 1 ते 7 यांच्या कारकिर्दीत रस्त्या रस्त्यावर रस्त्याच्या कडेला, गावठी व देशी दारूची विक्री होत असल्याने जुगार व सट्टा बिनधास्तपणे चालत असल्याने भांडणाचे प्रमाण हे वाढले आहे. तरी अ.नं.8 ते 9 यांची देखिल कठोरात कठोर चौकशी करून यांच्यावर देखिल फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यात यावा, तसेच ज्या अमानुष पध्दतीने आदिवासी तडवी भिल्ल समाजातील लोकांच्या मोटर सायकली बळजबरीने मनमानी पध्दतीने कब्जात घेऊन गैर आदिवासींचे नुकसान भरपाई करण्यासाठी अ.नं. 1 ते 7 हे प्रयत्न करत असून ते दि. 7/3/2023 रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाज वस्तीवर हल्ला करणारे लोकांच्या मोटर सायकली ताब्यात आजपावेतो घेतांना दिसून आले नाही व आदिवासी तडवी भिल्ल समाजाचे नुकसान भरपाई केल्याचे वृत्त देखिल समोर आले नाही. म्हणजेच पोलीस प्रशासन अ.नं. 1 ते 7 हे जाणून बुजून आदिवासी तडवी भिल्ल समाजाला संपविण्यासाठी स्थानिक लोकांच्या मदतीने षडयंत्र रचून आपल्या पदाचा गैरवापर करत आहे असे दिसत असल्याने 

सदरील अधिकारी व कर्मचारी 

यांचे नावे खालीलप्रमाणे 

१) ए.पी. आय. श्री. महेंद्र वाघमारे साहेब २) पी. एस. आय. श्री. अमोल पवार साहेब ३) रविंद्र पाटील, ४) आर. के. पाटील ५) किरण ब्राम्हणे ६) रणजित पाटील ७) शिवनारायण देशमुख वरील नं. १ ते ७ सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी पिंपळगांव पोलीस स्टेशनचे आहेत.

 १) विजय पांडूरंग लोधी २) दिनेश संभाजी पाटील (जुगार अड्डा चालविणारे व व्याजाने पैसे देणारे खाजगी सावकार) आहेत.

यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांची विभागीय चौकशी लावण्यात येऊन त्यांना तातडीने निलंबीत करण्यात यावे. अन्यथा बिरसा फायटर्स महा,राज्य व सामाजिक संघटनेच्या वतीने पिडीत परिवारा समवेत व संपूर्ण आदिवासी समाजामार्फत येणाऱ्या 15 दिवसात आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण व आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा फायटर्स तर्फे व सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार