धडगाव :- धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत गौऱ्या येथील ग्रामसभा दि.24 मार्च 2023 रोजी घेण्यात आली. या ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणुन गौऱ्या येथील लोकनियुक्त सरपंच सोनिबाई शिवाजी पराडके तर उपाध्यक्ष म्हणून उपसरपंच मिनेश गुलाबसिंग पराडके हे होते.
ग्रामसभेत पुढील विषयावर चर्चा करण्यात आली.
मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
मागील तीन महिन्यात झालेल्या जमा - खर्चासा मंजुरी देणे.
मागील तीन महिन्यात झालेल्या जन्म - मृत्यू नोंदणीचा आढावा घेणे.
वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले परिपत्रके सूचना विषय यावर सविस्तर चर्चा करणे.
सन 2023 - 24 या कालावधीचा वार्षिक आराखडा आमचा गाव आमचा विकास जीडीपी अंतर्गत तयार करणे.
शबरी आवास योजना मंजूर उद्दिष्ट प्रमाणे लाभार्थी निवड करणे.
प्रधानमंत्री आवास प्लस योजना डोळ्यातील अंतर्गत कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतील संपूर्ण लाभार्थ्यांचे पंचायतीला कागदपत्रे सादर करणे लाभार्थ्यांचे कारणे शोधून अपात्र करणे.
गावातील शाळा,अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या कामकाजाच्या आढावा घेणे व त्यांचे मूल्यमापन उत्कृष्ट / चांगले / समाधानकारक /असमाधानकारक करून त्याबाबतचा अहवाल गट विकास अधिकारी यांना सादर करणे.
गाव पातळीवरील विविध समित्या उप समित्या स्थापन करणे.
वन विभाग,महसूल विभाग व तालुका कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेणे.
माननीय अध्यक्ष सर यांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयावर चर्चा करणे.
ग्रामसेवक डी. एस. पाटील यांनी वरील सर्व मुद्द्यांवर एकदम व्यवस्थित रित्या ग्रामस्स्थांना समजून सांगितले. ग्रामसभेबरोबरच विधायक भारती अंतर्गत बालविवाह संबंधित विषयावर देखील चर्चा करण्यात आली. आणि सर्व ग्रामस्थ यांनी या विषयाचा आढावा घेतला आहे. यापुढे गावात बालविवाह होऊ देणार नाहीत असे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने सांगण्यात आले.
या गौऱ्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सोनिबाई शिवाजी पराडके, उपसरपंच मिनेश गुलाबसिंग पराडके, सदस्य अमृत विऱ्या पराडके, राजू राया पराडके, रविंद्र पारता पराडके, रंजना सिंगा पराडके, रंजीला अशोक पराडके, ज्योती कुवरसिंग पराडके, निता दिलरसिंग पराडके, प्रतिभा सुरसिंग पराडके, तसेच पशु संवर्धन विभाग, पोलीस पथक, अंगणवाडी, अशासेविका, विधायक भारती विभाग,माजी तालुका अध्यक्ष शिवाजी दादा पराडके (भाजपा ) , विजय पराडके (शिक्षक), सिना पराडके (वकील ),जेष्ठ नागरिक मिठ्या दादा पराडके, सामाजिक कार्यकर्ता कुवरसिंग पराडके, सुंड्या पराडके, तसेच आदी ग्रामस्थ या ग्रामसेभेला उपस्थित होते.