गांधी विचार संस्कार परीक्षेत मेहुणबारे आश्रमशाळेचे यश

चाळीसगाव :- गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगांव तर्फे आयोजित 'गांधी विचार संस्कार परीक्षा 2023' मध्ये मेहुणबारे ता.चाळीसगाव येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.यात विशेष बाब म्हणजे चि.मोवाश्या जहाँग्या पावरा इ 10 वी हा सुवर्णपदक मिळून जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर पोपट कुवरसिंग पावरा इ 7वी व समीर रोहिदास पावरा इ 5वी जिल्ह्यातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले,,त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आण्णासो श्री राजेंद्र रामदास चौधरी व सचिव बापूसो श्री विजय रामदास चौधरी तसेच मुख्याध्यापक श्री वैभव चौधरी व मुकेश चौधरी यांनी अभिनंदन केले. सदर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संपूर्ण मेहुनबारे पंचक्रोशीतून कौतूक होत आहे

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार