जळगाव :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मध्ये भरत गावित हे सिनेट सदस्य पदी यापूर्वी निवडून आले आहेत. विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कॉन्सिल या पदासाठीच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जळगाव येथे मा.भरत गावित यांनी अनुसूचित जमाती ( ST ) प्रवर्गातून मॅनेजमेंट कॉन्सिल पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा विरोधात एक ही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे त्यांची या मॅनेजमेंट कॉन्सिल पदासाठीच्या निवडणुकीत बिनविरोध निवड होणार आहे.यावेळी विद्यापीठाचे सर्व सन्मानिय सिनेट सदस्य, प्राचार्य, गुरुवर्य व हितचिंतक यांनी मा.भरतभाऊ गावित यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.