कनिलाल कोकणी
जळगाव :- कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे झालेल्या अधिसभा ( सिनेट ) सदस्यांचा व्यवस्थापन समिती एस.टी.प्रवर्ग गटातून सदस्य पदीच्या निवडणुकीत विसरवाडी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मा.भरतभाऊ गावित यांची बिनविरोध निवड झाली त्या संदर्भात आज रोजी जळगाव येथे आयोजित जाहीर सत्कार समारंभ स्थळी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी प्रमाणपत्र देऊन अधिकृत रित्या मा.भरतभाऊ गावित हे बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित केले व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. याप्रसंगी मान्यवर, नवनिर्वाचित अधिसभा सदस्य, प्राचार्य, गुरुवर्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.