चाळीसगाव :- दि. 19फेब्रुवारी 2023 रोजी संस्थेचे अध्यक्ष आण्णासो राजेंद्र रामदास चौधरी व सचिव बापूसो विजय रामदास चौधरी यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करण्यात आली. व महाराष्ट्र राज्यगीत घेण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मुकेश सखाराम चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वैभव चौधरी सर,ज्येष्ठ शिक्षक श्री. मोहन जाधव ,दिगंबर कुलकर्णी , ज्येष्ठ शिक्षक श्री. अशोक चौधरी शिरीष बाविस्कर सर हे होते याप्रसंगी प्रतिमा पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थी भाषणामधून मोवाश्या वसावे ,कृष्णा टोकरिया , यांनी आपल्या भाषणामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले व त्यांच्या कार्याची माहिती दिली. मोवश्या पावरा, सुहालाल पावरा व कृष्णा टोकरिया यांनी गीत गायन केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकेश चौधरी यांनी त्यांच्या जीवनातील प्रसंगावर माहिती करून दिली.प्रमुख पाहुणे वैभव चौधरी यांनी स्वराज्या ची संकल्पना ते निर्मिती या विषयी माहिती करून दिली. शिक्षक मनोगत मोहन जाधव सर यांनी केले शिवकालीन मंत्रिमंडळ ते युद्ध रणनीती व गनिमी कावा या विषयी माहिती करून दिली. महाराजांच्या नियोजनाप्रमाणे आपण सुध्दा अभ्यासाचे नियोजन केले पाहिजे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा टोकरीया व गोविंद बारेला या विद्यार्थ्यांने केले आभार प्रदर्शन सौ छाया पाटील यांनी केले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Post a Comment