दिल्लीत शैक्षणिक सहलीवर असलेल्या जळगाव विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था खासदार उन्मेष पाटील यांनी केली
दिल्ली :- जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेश पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील सामाजिकशास्र प्रशाळा मधील राज्यशास्र विभागाचे विद्यार्थी दिल्ली येथे शैक्षणिक सहलीवर असून खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी राहण्याची व्यवस्था केल्याने विद्यार्थी भरावले. सदर शैक्षणिक सहलीला 9 विद्यार्थी 4 विद्यार्थिनी असे एकूण 13 विद्यार्थी आणि त्यांच्या सोबत 4 प्राध्यापक आणि एक मॅडम हे दिल्ली येथे शैक्षणिक सहलीवर आहे. सदर सहलीला संजय पराडके, अविनाश सोनवणे, विनायक पाटोळे, निलम जाधव, मंजुषा सूर्यवंशी, मछिंद्र अवचिते, मनिषा निकुम, वैशाली कोळी, मनोज पावरा , नागराज अहिरराव, अमोल बागुल, राकेश पाटील, फैझान पटेल, वरील प्रमाणे विद्यार्थी आणि प्राध्यापक कल्पेश चौधरी, अक्षय सपकाळे, बाबासाहेब जाधव, लोकेश तायडे, सहाय्यक प्राध्यापिका पौर्णिमा देशमुख तसेच हे सर्व सध्या दिल्ली येथे शैक्षणिक सहलीवर आहे. सदर शैक्षणिक सहली ही सामाजिक शास्र प्रशाळाचे संचालक प्रा. डॉ. अजय पाटील व राज्यशास्र विभाग प्रमुख डॉ. उमेश गोगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे. या शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थी आणि प्राध्यापक हे संसद भवन, राष्ट्रपती भवन,अनुसूचित जनजाति आयोग आय. सी. एस. एस. आर. इत्यादी ठिकाणी भेट देणार आहेत.
Post a Comment