जळगाव :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील माध्यमाशास्र प्रशाळेत तीन दिवसीय राज्यस्तरीय नेट, सेट, पेटमार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दि.22 ते 24 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. नेट,सेट,आणि पेट परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असणारे पेपर क्र.1 यासाठी ही कार्यशाळा असून जे विद्यार्थी या परीक्षेच्या तयारी करत असेल किंवा इतर परीक्षा देत असेल तर या कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा हे मार्गदर्शन सर्वांसाठी हे मार्गदर्शन कार्यशाळा असणार आहे. कार्यशाळा ही ऑफलाईन आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष या कार्यशाळेत सहभागी व्हावे लागेल आणि तीचे प्रसारण कुठेही होणार नाही.
कार्यशाळेचे स्तळ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव हे असून दि.22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी,2023 रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 5:00वाजता पर्यंत दररोज असणार आहेत. त्यामुळे त्यात जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे. त्यात जे सहभागी होतील त्यांना चहा, नास्ता, दुपारचे जेवण आणि चहा मिळेल. ज्या सहभागींना निवास व्यवस्था हवी असेल तर त्यांनी नोंदणी अर्जात तसे नमूद करावे असे सांगितले आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्था आयोकांमार्फत केली जाईल. तसेच त्यांचा रात्रीचे जेवणाची सोय सुद्धा करू असे आयोजकांमार्फत केली जाईल. पण त्यासाठी पाचशे रुपये मात्र द्यावे लागेल. सहभागी स्थळी येणे आणि जाण्याची जबाबदारी प्रत्येक सहभागींची स्वतः ची असेल.सहभाग नोंदणी साठी ( ऑनलाईन ) अत्यावश्यक असून 20 फेब्रुवारी,2023 रोजी पर्यंतच नोंदणी सुरु राहील. यासोबत गुगल फार्म संलग्नीत आहे.
(लिंक :- http:// tiny. cc/From -NET -SET - PET )
(लिंक : http:// tiny. cc/WAGroup -NET -SET -PET )
सहभाग शुल्क रुपये 1500/-+ निवासाचे 500/- असे रु. दोन हजार रोख स्वरूपात दि.22 फेब्रुवारी 2023 रोजी प्रत्यक्ष जमा करायचे आहे. असे सांगितले आहे. प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ.कमलाकर पायस, (तकक्षशिला महाविद्यालय अमरावती)प्रा. डॉ पल्लवी इंगोले (वसंतरावं नाईक महाविद्यालय धारणी जि. अमरावती)प्रा. डॉ. राजेश बोबडे (शामाप्रसाद मुखर्जी महाविद्यालय शेंदुरंजनाघाट ता. वरुड जि. अमरावती )प्रा. रवींद्र पाटील (या. द. व. देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तिवसा जि. अमरावती ) हे चार प्रमुख व्याख्याते म्हणून या कार्यशाळेत उपस्थित राहणार आहे. आणि माध्यमशास्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ सुधीर भटकर, आणि त्यांचे सहकारी मित्र प्रा. डॉ गोपी सोरडे, प्रा. डॉ सोमनाथ वडनेरे, आणि प्रा.डॉ . रोहित कसबे यांनी या तीन दिवसीय राज्यस्तरीय नेट, सेट, पेट या मार्गदर्शन कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले.