अमळनेर :- अमळनेर तालुक्यातील मुळी प्रगणे डांगरी येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली सदर समितीवर सर्वानुमते बिनविरोध निवडून आलेले सभासदांनी अध्यक्षपदी श्री वाल्मीक सुरेश पवार यांची तर बोदर्डे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री तुषार भाऊ सैंदाणे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आले त्याप्रसंगी दोन्ही गावातील सरपंच उपसरपंच तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या नूतन कार्यकारणीवर निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार सोहळा नुकताच ग्रामपंचायत कार्यालय मुडी च्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी भारतीय जनता पार्टी चे अमळनेर पंचायत समितीचे उपसभापती श्री भिकेशभाऊ पाटील तसेच मुडीचे लोकनियुक्त सरपंच श्री काशिनाथ भाऊ माळी उपसरपंच योगेश सोनवणे ग्रामविकास शिक्षण संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी श्री हर्षल भाऊ सोनवणे लोन येथील सरपंच श्री कैलास पाटील माजी सरपंच नारायण दादा पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष विकी भाऊ सूर्यवंशी लोन चारम येथील दीपक पाटील भटू पाटील रावसाहेब पाटील तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन हेमंत सूर्यवंशी दिनेश सूर्यवंशी पप्पू पाटील दिलीप आप्पा पाटील देवेंद्र भाऊ गिरासे ग्रामपंचायत सदस्य उदय वसंतराव सोनवणे प्रदीप पाटील अशोक पाटील दिलीप देशमुख तसेच नाटुलाल चौधरी अशोक पाटील इत्यादी मान्यवर यांनी उपस्थिती देऊन दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभासद मंडळी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार सोहळा यशस्वी केला शाळा व्यवस्थापन समितीला यापुढे कुठलीही मदत लागल्यास भारतीय जनता पार्टी अमळनेर तर्फे तसेच पंचायत समिती अंमळनेर तर्फे सहकार्य केले जाईल असे उपसभापती श्री भिकेश भाऊ पाटील यांनी नमूद केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप पाटील सरदार भाऊ कोळी यांचे अनमोल सहकार्य लाभले.