ससंद भवनाला बघून स्वप्नपूर्ती झाल्यासारखी वाटले - प्रा. लोकेश तायडे

जळगाव :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे प्रशाळेच्या राज्यशास्त्र विभागातर्फे तीन दिवसीय विद्यार्थी अभ्यास दौरा दिल्लीला नेण्यात आला होता.यात संसद भवन, राष्ट्रपती भवन, अनुसूचित जनजाती आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग, आयसीएसएसआर आदी ठिकाणी भेट देण्यात आली. प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. अजय पाटील व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उमेश गोगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा पार पडला.या दौऱ्याचे नेतृत्व संघ व्यवस्थापक म्हणून मी स्वतः केले.सर्व विद्यार्थी हे राज्यशास्त्र विषयाचेच असल्याने देशाच्या सर्वात महत्वाच्या इमारती समोर म्हणजेच संसद भवनाला बघून सर्वांना स्वप्नपूर्ती झाल्यासारखी वाटली.बहुतांश विद्यार्थी हे पहिल्यांदाच दिल्लीला आले होते तरीदेखील विद्यार्थ्यांची शिस्त , सहकाऱ्यांची मदत , तसेच अनेक लोकांचे कळत नकळत सहकार्य लाभले त्यामुळे हा दौरा आम्ही यशस्वी रीतीने पूर्ण करू शकलो.
                 श्री.लोकेश तायडे 
               सहाय्यक प्राध्यापक
     राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ   जळगाव.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार