जळगाव :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 31 वा पदवीप्रदान समारंभ आज दि.17 फेब्रुवारी 2023 रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी समारंभाला पदवी घेण्यासाठी माध्यमशास्र प्रशाळेचे 2021,22 या शैक्षणिक वर्षातील काही विध्यार्थी हजर राहिले होते. तरी त्यांनी अचानक मला सन्मानित केले. त्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या सर्व मनसन्मानात हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठा आहेत असे माध्यमशास्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ सुधीर भटकर यांनी विद्यार्थांना धन्यवाद दिले आणि पुढील भविष्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या.यावेळी माध्यमशास्र प्रशाळेचे संचालक, प्रा. डॉ. सुधीर भटकर,प्रा. डॉ. गोपी सोरडे, प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे, प्रा. रोहित कसबे, आणि माध्यमशास्र प्रशाळेचे विध्यार्थी उपस्थित होते.