अमळनेर :- तालुक्यातील मुडी बोदरडै जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती 2023 24 करिता नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली सदर समितीवर सर्वानुमते अध्यक्षपदी श्री वाल्मीक सुरेश पवार तर उपाध्यक्षपदी श्री तुषार उत्तमराव सैंदाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष आणि नूतन कार्यकारणी सदस्यांचा शाळेचे मुख्याध्यापक श्री आर के पाटील सर तसेच सतीश शिंपी सर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री प्रवीण सदानशिव सरपंच बोदडै तसेच माजी सरपंच संतोष गुलाबराव चौधरी विकास पाटील उदय शिंदे उदय वसंतराव सोनवणे हिरालाल बडगुजर भैय्यासाहेब सूर्यवंशी अरुण भिल पी डी बोरसे रामचंद्र सूर्यवंशी तसेच नगराज चौधरी विकास सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते