तालुका प्रतिनिधी
तुषार सैदाणे / अमळनेर
अमळनेर :- मुडी प्रगणे डांगरी येथे नुकतेच राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा बळीराजा उद्योग समूह आणि संभाजी ब्रिगेड अंमळनेर तसेच डॉक्टर उल्हास पाटील गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील तसेच प्रमुख पाहुणे श्री श्याम भाऊ पाटील विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड आणि डॉक्टर रामराव पाटील व सुनील पवार माजी मुख्याध्यापक एच एल पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक आधार पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्य सेवा आपल्या दारी या उपक्रमांतर्गत विविध आजारांवर उपचार करण्याकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन संभाजी ब्रिगेड शाखा अमळनेर आणि बळीराजा ॲग्रो एजन्सी मार्फत आयोजित करण्यात आले होते माननीय आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस श्री श्याम भाऊ पाटील यांच्या व व उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार अनिल दादा पाटील होते गोदावरी फाउंडेशन भुसावळ यांच्या अनमोल सहकार्याने आणि डॉक्टर पियुष पवार आणि त्यांच्या दहा आरोग्य विषयात पारंगत असलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने विविध आजारांवर जनजागृती करण्यात आली मोफत तपासणी अभियानांतर्गत 220 पेक्षा जास्त रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच 60 पेक्षा जास्त रुग्णांची टू डी इको तपासणी आणि पुढील संदर्भ सेवेसाठी 30 रुग्णांचे प्रस्ताव डॉक्टर उल्हास पाटील हॉस्पिटल भुसावळ पाठविण्यात आले डॉक्टर जानवी बनकर तसेच डॉक्टर हेतवी वैद्य महिला डॉक्टरांमार्फत हृदयविकार त्वचा विकार आणि नेत्रविकार संदर्भात उपचारासाठी सखोल तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.आरोग्यविषयक शिबिराच्या जनजागृतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ साक्षी बोरसे तसेच डॉक्टर मोहन धनगर आरोग्य सेविका मनीषा परदेशी आशा वर्कर सौ सुनीता सैंदाणे उषाबाई पाटील ज्योती पाटील सुरेखा बडगुजर अंगणवाडी सेविका अलकाबाई सैंदाणे उषाबाई गणपत पाटील श्रीमती नलुबाई शिंदे श्रीमती तुळसाबाई धनगर यांचे अनमोल सहकार्य लाभले राजमाता जिजाऊ महिला महाआरोग्य मोफत तपासणी अभियानांतर्गत परिसरातील 220 पेक्षा जास्त गरजू आणि आरोग्य सेवेपासून वंचित लाभार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात येऊन 60 पेक्षा जास्त महिला यांची टू डी इको तपासणी करण्यात आले हृदयविकार त्वचा विकार नेत्रविकार यामध्ये सरासरी 80 रुग्णांची मोफत तपासणी करून पुढील उपचारासाठी गोदावरी फाउंडेशन भुसावळ येथे संदर्भ सेवेसाठी पाठविण्याचे श्री किरण भाऊ सूर्यवंशी आणि तुषार भाऊ सैंदाणे यांनी जाहीर केले महात्मा बळीराजा ऍग्रो समूह गेल्या तीन वर्षापासून विविध समाज उपयोगी आरोग्य विषयक कृषी विषयक आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलांना कलागुणांना वाव मिळावा याकरिता विविध उपक्रम राबवित असल्याचे मुडी चे माजी सरपंच नानासाहेब निळकंठ पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले पांजरा परिसराच्या विकासासाठी सदैव असेच समाज उपयोगी उपक्रम राबविले जातील याकरिता नागरिकांनी किरण पाटलांच्या पाठीशी उभे राहावे असे प्रतिपादन माननीय आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले.गोरगरीब जनतेसाठी मोफत आरोग्य सेवा तेही नामवंत तज्ञ डॉक्टर समूहांकडून ग्रामीण भागात सेवा उपलब्ध करून देणाऱ्या किरण सूर्यवंशी या नवतरुणाकरिता आदर्शवत उदाहरण असल्याचे माननीय आमदार अनिल भाईदास पाटील यांनी नमूद केले असे समाज उपयोगी उपक्रम नियमित आयोजित व्हावेत याकरिता नवतरुणांनी पुढाकार घेऊन जनतेसाठी सदैव तत्पर राहावे अशी इच्छा व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तुषार भाऊ सैंदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संजीव पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नानासाहेब निळकंठ पाटील तसेच गौरव उदय पाटील प्रणव सुनील पाटील राजेंद्र निळकंठ पाटील श्री उदय शिंदे श्री तुषार पाटील राकेश पाटील पंढरीनाथ पाटील सतीश पाटील चंद्रकांत पाटील जगदीश पाटील तेजस पाटील भूषण सोनवणे सतीश गुरव आणि नवतरुण मित्र मंडळ मुळी यांचे अनमोल सहकार्य लाभले.