गौऱ्या येथे ग्रामपंचायतीत भाजपा चे ग्रामविकास पॅनलचा लोकनियुक्त सरपंच तर लोकशाहीचे सहा सदस्य विजयी

धडगाव तालुक्यातील गौऱ्या येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडले. दि.18डिसेंबर 2022 रोजी झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकी मधे गौऱ्या ग्रामपंचायतीवर भाजपाने एक हाती बाजी मारली आहे. दि. 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी दहा वाजेपासून  मतमोजणी  सुरु झाली होती. गौऱ्या येथे एकूण 1233 मतदान झाले होते.त्यात  गौऱ्या ग्रामपंचायत मधे शिवाजी दादा पराडके माझी सरपंच तथा माझी तालुकाध्यक्ष भाजपा (धडगाव ) यांच्या ग्रामविकास पॅनल मधुन सोनी शिवाजी पराडके यांची  सरपंच पदी निवड झाली आहे.आणि सदस्य मधे वार्ड क्र.01 ममधून  राजु राया पराडके, रंजना सिंगा पराडके, रंजिला अशोक पराडके तर वार्ड क्र.02 मधून मिनेश गुलाबसिंग पराडके, प्रतिभा सुरसिंग पराडके, वार्ड क्र.03 मधून अमृत विऱ्या पराडके असे एकूण 6 सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच हे गौऱ्या ग्रामपंचायतीत भाजपा कडून निवडून आले आहे. 

विशेष म्हणजे धडगाव तालुक्यातील  गौऱ्या  अशी एकमेव ग्रामपंचायत आहे की जिथे भाजपा ला नष्ट करण्यासाठी धडगाव तालुक्यातील शिवसेना तसेच काँग्रेस या पक्षाचे सर्व नेत्यांनी  खुप कष्ट केले पण तरी देखील शिवसेना आणि काँगेस पक्षाची युती असतांना देखील भाजपाने  एक हाती आपली सत्ता ही गौऱ्या ग्रामपंचायती वर मिळवली आहे. त्याबद्दल सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे आणि गावाकऱ्यांचे शिवाजी दादा पराडके यांनी विशेष आभार मानले आहे.

 

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार