अनुदानित आदिवासी प्राथमिक ,माध्यमिक , उच्च माध्यमिक आश्रम शाळा खडकी बुद्रुक येथे ' राष्ट्रीय गणित दिवस ' उत्साहात साजरा


चाळीसगाव :- अनुदानित आदिवासी प्राथमिक ,माध्यमिक , उच्च माध्यमिक आश्रम शाळा खडकी बुद्रुक ॥ तालुका चाळीसगाव येथे *राष्ट्रीय गणित दिवस* उत्साहात साजरा करण्यात आला. दि. 22 डिसेंबर . खडकी बुद्रुक ॥ आमच्या अनुदानित आदिवासी आश्रम शाळा खडकी बुद्रुक येथे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . शाळेतील गणित शिक्षक श्री. प्रशांत बळीराम लवंगे सर यांनी विद्यार्थ्यांना गणित शास्त्रज्ञ माहिती प्रदर्शन भरविले . विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले .विद्यार्थ्यांना विविध भौमितिक आकृत्यांच्या रूपात बसवून भौमितिक आकार तयार केले .


गणित शास्त्रज्ञ प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री .अमोल साहेबराव घोडेस्वार यांनी केले .कार्यक्रमाचे कौतुक संस्था अध्यक्ष प्राध्यापक श्री संजय  घोडेस्वार सर , प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती . रंजना घोडेस्वार यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री मिलिंद भालेराव सर , श्री किशोर वाणी , श्री पवार सर ,श्री वळवी सर ,श्री चव्हाण सर ,श्री क्षीरसागर सर ,श्रीमती सोनवणे मॅडम , श्री राजपूत सर ,श्री घोडेस्वार विनायक सर ,श्रीमती योगिता पुरकर मॅडम , श्री राजेंद्र जाधव सर , श्रीमती दराडे मॅडम यांनी प्रयत्न केले .

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार