खडकी बु येथील खेळाडूचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश


 

      चाळीसगाव :- दि 30 नोव्हेंबर 2022 खडकी बुद्रुक येथील अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खडकी बु तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव .येथील विद्यार्थी दिनांक 25 नोव्हेंबर 2022 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आदिवासी विकास विभाग यावल आयोजित प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा. कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव . येथे संपन्न झाल्या . त्यात आमच्या शाळेतील खेळाडू विविध खेळप्रकारात यश संपादन केले. 


14 वर्षे आतील मुले:-  अर्जुन जेमाल्या पटले - गोळा फेक - प्रथम 

 14 वर्षातील मुले - खो खो चा संघ विजयी झाला आणि 14 वर्षे आतील मुले हँडबॉल संघ उपविजेयी ठरला.

 14 वर्षे आतील मुली :- 1) रशिला पारता वसावे - गोळा फेक - प्रथम, तर 600 मीटर धावणे - प्रथम 

2) वंदना दिलीप वसावे - 400 मीटर धावणे प्रथम , 100 मीटर धावणे द्वितीय

  14 वर्ष आतील मुली खो-खो संघ विजयी.            

   १७ वर्ष आतील मुली  : - 1)सुनीता चेना पावरा 3000 मीटर चालणे - प्रथम , 

2) स्वाती सुखदेव सोनवणे - गोळा फेक प्रथम , भाला फेक - द्वितीय 

१७ वर्ष आतील मुली हँडबॉल संघ उपविजयी.

 १७ वर्ष आतील मुले 

1) दिपक भिका वसावे - थाळीफेक द्वितीय.         

    19 वर्ष आतील मुले : - 1) गणेश सुनील वळवी 3000 मीटर धावणे द्वितीय, 2) खाल्या काल्या वसावे थाळी फेक द्वितीय,3) तुषार शामसिंग पाडवी उंच उडी प्रथम.4) रतिलाल कर्मा वसावे 5000 मीटर चालणे प्रथम .

19 वर्षे आतील कबड्डी संघ :-1)गणेश सुनील वळवी कबड्डी निवड व सेहवाग नवलसिंग पावरा कबड्डी निवड. 19 वर्षे आतील मुली 4×400 रिले उपविजयी या सर्व खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक माजी आमदार मा. प्रा.साहेबराव घोडे सर , 

मा. संजय घोडेस्वार सचिव एकलव्य एज्युकेशन मंडळ चाळीसगाव तथा माजी नगर सेवक तसेच प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती रंजना घोडेस्वार मॅडम व माध्यमिक मुख्याध्यापक श्री अमोल घोडेस्वार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच क्रीडा शिक्षक लक्ष्मण वळवी सर , चंद्रकांत ठाकरे सर , सविता सोनवणे मॅडम , मिलद भालेराव सर , आणि प्रशांत लवगे सर यांनी अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सर्व खेळाडूचे विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.


0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार