नवनिर्मीत मोलगी शहाराला तालुका घोषीत करा
मोलगी :-सातपुडा युवक मित्र मंडळच्या वतीने डॉ. विजयकुमारजी गावीत सो., आदिवासी विकास , मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले की,सातपुडातील अतीदुर्गम भागातील जवळ जवळ २५०-३०० गावाचा महत्त्वाचा मुख्य बाजारपेठ मोलगी शहर आहे. मोलगी शहाराचा परीसरात जवळपास ८० ते ८५ गृप ग्रामपंचायती येत आहेत. सातपुड्यातील प्रत्येक गृप ग्रामपंचायतांना, सरपंच व सर्व सामान्य जनतेला छोट्या-मोठ्या
कारणानिमीत्ताने अक्कलकुवा तालुक्यात जाणे खुप गैरसोय होत असतात. गेल्या १० ते १५ वर्षापासून आम्ही तत्कालिन स्वर्गीय मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेजी व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व विरुध्द पक्षाचा नेत्यांना सातपुडातील दुर्गम भागात मोलगी शहरात व मोलगी परीसरात दौरा असतांना अनेक वेळेस निवेदने विविध सामाजिक संघटनांमार्फत व राजकीय पक्षातर्फे देखील मोलगी शहराला तालुका घोषीत करणेसाठी अनेकवेळा निवेदनाचा पाठपुरावा केला आहे. परंतु शासन स्तरावर अद्यापी कुठलाही पाठपुरावा होतांना दिसत नाही. सातपुडा परीसरातील नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे व सातपुडा वासियांची अनेक वेळा गैरसोय होत असते. सदरील सातपुडा वासियांची अडचणी लक्षात घेऊन मोलगी शहराला तात्काळ तालुका म्हणुन घोषीत करण्यात यावे. सातपुड्याचा शेवटचा टोकापर्यंत अक्कलकुवा येथे जाण्यासाठी नागरीकांना खुप गैरसोयी होतांना दिसते, वेळेवर बस भेटत नाही, खाजगी वाहतू भाडे वाढवून सातपुडा वासियांची लुटमार करतांना दिसते, नर्मदा क ते अक्कलकुवा पर्यंत येणेसाठी वाहने देखील वेळेवर भेटत नाहीत, अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. सातपुड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक
कागदपत्रासाठी अक्कलकुवा येथे तहसिल कार्यालयातील कर्मचारी वेळेवर भेटत नाही, विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे वेळेवर तयार होत नाही, मग विद्यार्थ्यांची वर्ष वाया जाते, त्यांने विद्यार्थ्यांची मानसिक परिस्थिती बिघडून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होत आहेत. शैक्षणीक वर्षाकरीता लागणारे कागदपत्रे वेळेवर न मिळाल्याने विद्यार्थी व्यासनाधिनताकडे वळून विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधारमय होत आहे. सातपुडा वासिय पालकाला आर्थिक परिस्थितीला तोंड देणेसाठी विद्यार्थी परराज्यात निघून जात आहेत, या सर्व गोष्टीला आटोक्यात आणणेसाठी मोलगी शहराला तालुका घोषीत करणे अत्यंत महत्वाचे आहे..शासकीय योजनेचा लाभ घेणेसाठी देखील तालुका स्तरावर वेळोवेळी जाणेसाठी आर्थिक फटका सातपुडा वासियांना सहन करावा लागत आहे. अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नाही. सातपुडातील गरीब जनतेला पुन्हा रिकाम्या हाताने घरी परतावे लागत असते,या सर्व गोष्टीपासून सातपुड्यातील गोर-गरीब जनतेला न्याय मिळवून द्यायचे असेल तर मोलगी शहराला तालुका घोषीत करणे अत्यंत महत्वाचे आहे.. सातपुड्याच्या शेवटचा टोकावर वस्तीत राहणारे आमचे आदिवासी बांधव वृध्द पेंशन घेणारे व वृध्द व्यक्ती दिवसभर अक्कलकुवा तहसिल कार्यालयात बसून वृध्द पेंशन चा फॉर्म भरणेकरीता धडपड कमी असतात, तरी देखील तहसिल कार्यालयातील कर्मचारी उडवा उडवी देत वृध्द व्यक्तीस कागदपत्रांची त्रुटी काढून फॉर्म स्वीकारीले जात नाह वृध्द व्यक्तीस कागपत्राची पुर्तता करुन परत सदरील योजनेचा लाभ घेणेसाठी तालुका स्तर अक्कलकुवा येथे जाणे अशक्य होते. म्हणुन सदरील वृध्द व्यक्तीस वृध्द पेंशन योजनेपासून वंचित राहावे लागते, सदरील वृध्द व्यक्तीस न्याय मिळवून देणेकरीता मोलगी शहराला तालुका म्हणुन घोषीत करणे अत्यंत व जरुरीचे आहे. त्यामुळे ज्या सरकारी योजनेपासून सातपुड्यातील नागरीक वंचित राहतात त्यांना शासकीय योजनेचा लाभ घेणेस मदत होईल.अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना देण्यात आले.निवेदन देतांना सातपुडा युवक मित्र मंडळचे उपाध्यक्ष अॅड. गजमल वसावे,अॅड.जितेंद्र वसावे,अॅड.राजेंद्र पाडवी अॅड.फुलसिंग वळवी, अॅड.जेठ्या वळवी,प्रा. संपत वसावे,डॉ. वसंत वळवी,आधीसह मोठ्या संख्येने सातपुडा परीसरातील ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.