एसडी-सीड तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती चे वितरण

 

जळगाव : - गुणवंत विध्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक तसेच उद्योजकीय कौशल्य विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविण्याचे लक्ष्य असलेल्या "एसडी-सीड" चा शिष्यवृत्ती वितरण सोहळा शनिवार, दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी शहरातील ७ शिवाजीनगर येथे मान्यवर पाहुणे, विद्यार्थी, पालक तसेच जळगावकर नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते दहा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यंदा शिष्यवृत्ती लाभार्थी विध्यार्थ्यांची संख्या ४०० पेक्षा जास्त असून एसडी-सीडच्या या उपक्रमाचे १५वे वर्ष आहे.

मंचावर रामानुजन इन्स्टिट्यूट, मद्रास विद्यापीठाच्या माजी संचालिका व प्रमुख डॉ.सौ.सुषमाजी वीरमणी (अग्रवाल), आयआयटी चेन्नईचे माजी प्राध्यापक डॉ.श्री.पी. वीरमणी जी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.श्री.विजयजी माहेश्वरी, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.अशोकभाऊ जैन, एसडी-सीडच्या कार्याध्यक्षा मीनाक्षीताई जैन, श्री.राजेशभाई जैन यांच्यासह शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन, श्री.राजाभाऊ मयूर, श्री.मेजर नानासो वाणी, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ.श्री.प्रसन्नकुमारजी रेदासनी हे उपस्थित होते.

यावेळी आदरणीय श्री.सुरेशदादा जैन यांनी ध्वनीचित्र फितीद्वारे उपस्थितांना संदेश देत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी एसडी-सीडला सहकार्य करणारे दाते श्री.अजयकुमारजी ललवाणी, श्रीमती नयनताराजी बाफना यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एसडी- सीडतर्फे वीरमणी दाम्पत्याला मीनाक्षीताई जैन, श्री.राजेशभाई जैन, निवृत्त प्राचार्य डॉ.श्री.एस.एस.राणे, प्राचार्या डॉ.सौ.गौरी राणे यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले. यावेळी श्री.एस.व्ही.सोमवंशी, श्री.सागर पगारिया, श्री.निळकंठ गायकवाड, श्री.शांताराम बडगुजर, डॉ.श्री.आर.एस. डाकलिया, निवृत्त प्राचार्य श्री.अजीत वाघ यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ईशस्तवन, गणेशवंदना, पसायदान कु.धनश्री जोशी हिने सादर केले. सूत्रसंचालन श्री.राजेश यावलकर, श्री.महेश गोराडे यांनी केले व आभार मीनाक्षीताई जैन यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार