सातपुडा बचाओ आंदोलनातर्फे मोलगी येथील पोलीस निरीक्षक यांना निवेदन, मयत विध्यार्थी साहिल दिलीप पाडवी यांची CBI द्वारे चौकशी करा,अन्यथा मोलगी येथे रास्तारोक आंदोलनाचा इशारा

 मोलगी :- छडवेल कोर्डे ता.साक्री येथील छात्रालयातील विद्यार्थी साहिल दिलीप पाडवी याच्या मृत्यूची सीबीआयद्वारे चौकशी  करण्यात येवून संबंधित संस्थेचे पदाधिकारी,  मुख्याध्यापकांची   नार्कोटेस्ट करण्यात यावी या मागणीसाठी दि.२४ नोव्हेंबरपासून सातपुडा बचाओ आंदोलन  भिल सोशल वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र ट्रायबल आघाडी नंदुरबार जिल्हा  नर्मदा प्रदेश विकास मोर्चा तर्फे मोलगी येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत सातपुडा बचाओ आंदोलनातर्फे मोलगी येथील पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छडवेल ता.साक्री येथील छात्रालयातील विद्यार्थी मयत साहिल दिलीप पाडवी (वय १५) रा. अटीबारीपाडा साकलीउमर ता.अक्कलकुवा याचा मृत्यू झाला.

त्याच्यावर दि.१८ नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी मयत विद्यार्थ्याचे वडील दिलीप पोना पाडवी यांनी त्याच्या मृत्यूबाबत गंभीर परिस्थिती निदर्शनास आणून दिली. मयत विद्यार्थ्याला जबर मारहाण करण्यात आली असून गळफास दाखवण्याचा आरोपींनी प्रयत्न केला आहे.

मृतदेह जमिनीवर टेकलेल्या अवस्थेत होता. गळफास घेतलेल्या रुम नंबर ९ मधील व इतर विद्यार्थ्यांना पालकांनी भेटण्याचा प्रयत्न केला असतांना विद्यार्थ्यांना भेटू दिले गेले नाही. याबाबत आरोपींची सीबीआयद्वारे चौकशी करुन कारवाई करावी व सदर प्रकरणाची राज्य सरकारने जलद चौकशी करून आरोपीची नार्कोटेेस्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मयताच्या पालकांच्या व परिसरातील आदिवासी जननतेच्या मागणीप्रमाणे चौकशी व कार्यवाहीसाठी सातपुडा बचाओ आंदोलन भिल सोशल वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र ट्रायबल आघाडी नंदुरबार जिल्हा व नर्मदा प्रदेश विकास मोर्चाच्या वतीने मोलगी ता.अक्कलकुवा येथे दि.२४ नोव्हेंबरपासून बेमुदत रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा डॉ.सतिष कागल्या पाडवी यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार